Thursday 21 May 2015

काही दिवसांपूर्वी माझं आणि माझ्या एका जिवलग मित्राचं बोलणं झालं, कि सध्या दहावीच्या मुलांना किती छान आणि खूप गुण मिळत आहेत. पण त्यातून अस लक्षात आलं कि आमच्या वेळी (म्हणजे २००२मध्ये) ८०% हून अधिक गुण मिळणारी मुलं साधारणतः प्रत्येक शाळेत  ४०-४५ असायची. (साधारण २०० मुलांमध्ये) आणि त्या पैकी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणारी साधारणतः ५-६ मुलं असायची.

पण आता मात्र चित्र बदलले आहे. आता २०० मुलांपैकी साधारणतः ८० हून अधिक मुलांना ८०% पेक्षा जास्त गुण असतात आणि त्या पैकी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणारी मुले २० पेक्षा अधिक असतात. म्हणजे ९०% हून जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण पुष्कळ वाढलं आहे.

पण माझ्या आणि मित्राच्या बोलण्यातून मला हे जाणवले कि, सध्याची प्रचलित शिक्षण पद्धती याला जबाबदार आहे का ???????

मला वाटतंय त्याचा उत्तर "हो"  असं आहे. आणि त्या मागची कारणं खालीलप्रमाणे:

  1. सध्या उपलब्ध असणाऱ्या शिक्षण पद्धती मध्ये मुलांना हे समजावलं जातं कि, जितके जास्त गुण मिळवाल तितका तुम्हाला कॉलेजमध्ये फायदा होईल. 
  2. परिणाम म्हणून प्रत्येक मुलगा/ मुलगी हे जास्तीत जास्त गुण मिळवण्याच्या धडपडीत राहतात.
  3. त्यात भर म्हणून हल्लीचे सुजाण पालक आपल्या पाल्याने जास्तीत जास्त गुण मिळवावे म्हणून त्यांना पाहिजे ते आणून देतात.
  4. त्यात कोचिंग क्लासेसना म्हणजे त्यातील शिक्षकांना जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी काय करावे याची क्लुप्ती माहित असते. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांकडून आवश्यक ती मेहेनत करून घेण्याचे कसब त्यांच्याकडे असते.
  5. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा जास्त गुण मिळवू शकतो.
  6. पण पुस्तकी ज्ञान आणि उपलब्ध असणारी माहिती हि त्या मुलाच्या / मुलीच्या दैनंदिन जीवनात कुठे आणि कशी वापरायची याची त्यांना माहिती नसते. परिणामतः त्या मुलांची पुढे प्रचंड फरफट होते.
  7. त्यात भर म्हणून पालक आपल्या मुलाची तुलना शेजारच्या आणि त्याच्या पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या मित्र अथवा भावंडासोबत करतात. आणि मग त्यातूनच आत्महत्येचा प्रयत्न हि मुलं करतात. कारण कूकर मध्ये वाफ कोंडली कि ती शिट्टी मधून बाहेर पडते. पण या मुलांच्या आत दडपलेली वाफ बाहेर पडूच शकत नाही.
म्हणूनच आपण म्हणतो कि, भारतीय शिक्षण पद्धती हि आदर्श आहे. पण ती खरच आदर्श आहे का ????
खूप विचार केला तर जाणवतं कि आपल्या समोर उभी आहे ती "आदर्श गुण कमवा " पद्धत आहे.


ती आपण बदलू शकतो का ????

उत्तर आपल्याकडे आहे. ते बघूया पुढील ब्लॉग मध्ये.


प्रथमेश मेहेंदळे.

No comments:

Post a Comment