Thursday 9 July 2015

आता मागील भागात मी म्हणालो कि, प्रचलित शिक्षणपद्धती हि  "आदर्श गुण कमवा पद्धती" आहे .
पण मग हि पद्धती चांगली कि वाईट ???????
तर यावर खूप प्रवाद आहेत. पण सारासार विचार केला तर असे लक्षात येते कि, या गुण कमवा पद्धतीत मुलांवर आणि विशेष करून पालकांवर जास्त ताण येतो. कारण कोणत्याही पालकाला हेच वाटते कि, आपल्या मुलाला सर्वात चांगली सुविधा मिळावी. या साठी ते रात्रीचा दिवस करतात.
पण त्यांच्या असे लक्षात येत नाही कि, त्यांच्या पाल्याकडे अपयश पचवण्याची ताकत नाही. कारण यशाची धुंदी हि क्षणिक असते आणि अपयश हे माणसाला जास्त चांगले बनवते.
अडोल्फ हिटलर चे प्रसिद्ध वाक्य आहे कि, "जर मी जिंकलो तर मला कोणीही काहीच विचारणार नाही, पण मी हरलो तर मात्र माझं कारण सांगायला मी असणार नाही."
मग या सर्व गोष्टींवर उपाय काय ??????????????
तर आपली प्रचलित शिक्षण पद्धत बदलावी ?????????
मग कोणती पद्धत आचरावी ???????
खूप विचार केल्यावर एकच उत्तर मिळाले.
ते म्हणजे आपल्या देशात पूर्वापार चालत आलेली "गुरुकुल पद्धत ". पण हा ती थोडीशी  बदलावी लागेल.
आपण ह्या जुन्या पद्धतीत खालील प्रमाणे बदल करु शकतो.

  1. गाव तिथे शाळा म्हणजे प्रत्येक गावात आणि शहरात एकाच शाळेला परवानगी असावी.
  2. देशातील सर्व शाळांमध्ये एकाच प्रकारचा अभ्यासक्रम असावा.
  3. शाळेतील पाल्य आणि पालक हे एकमेकांना एका ठराविक दिवशीच भेटू शकतील.
  4. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकसारख्या सोयी सुविधा उपलब्ध असतील.
  5. सर्व विद्यार्थ्यांना एका ठराविक पातळीचे समान शिक्षण मिळेल.
  6. त्या नंतर त्या विद्यार्थ्याची परीक्षा घेतली जाईल.
  7. त्यात असणाऱ्या गुणवत्ते नुसार त्या विद्यार्थ्याचे पुढील शिक्षण ठरवण्यात येईल, जे त्याला शाळेतच पूर्ण करावे लागेल.
  8. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यावर पुढे काय करायचे हा निर्णय सर्वस्वी त्या पाल्याचा असेल. त्याच्या पालकांशी तो संवाद साधू शकतो, पण कोणतेही पालक आपल्या महत्वाकांक्षा त्यावर लादू शकत नाहीत.
  9. त्याच बरोबर प्रत्येक पाल्याला सर्व प्रकारच्या कार्याचे ज्ञान मिळाले पाहिजे.
  10. उत्तम गुण कमावण्या बरोबरीने त्या पाल्याने शरीर सौष्ठवाकडे लक्ष दिले पाहिजे.
  11. संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पाल्य हा आपल्या पालकांकडे परतू शकतो.
शिक्षण पद्धतीचा हा ढोबळ नमुना मी या ठिकाणी मांडला आहे. ज्याचा उपयोग हा सर्वस्वी येणाऱ्या पिढीच भवितव्य ठरवण्यासाठी केला जाऊ शकेल अशी आशा मला वाटते. बघूया नजीकच्या भविष्यात काय होते.



प्रथमेश मेहेंदळे